आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revealed: Let Us Introduce You To Aamir Khan\'s Future Daughter In Law

आमिर लवकरच होणार सासरेबुवा, मुलगा जुनैदने शोधली भावी वधू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही मिस्टर परफेक्शनिस्टच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत एक आनंदाची बातमी. ती बातमी म्हणजे आमिर लवकरच सासरेबुवा होणार असल्याची चर्चा आहे. आमिरचा थोरला मुलगा जुनैद आता मोठा झाला असून त्याची एक गर्लफ्रेंडसुद्धा आहे.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुनैद आपल्या गर्लफ्रेंडविषयी गंभीर असून भविष्यात तिच्याबरोबर लग्न करण्याचा त्याचा विचार आहे.
जुनैद आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीनाचा मुलगा आहे. सध्या जुनैदचे ज्या मुलीशी अफेअर सुरु आहे तिचे नाव सोनम वर्मा आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सोनम वर्मा पोस्ट-ग्रॅज्युएशनची विद्यार्थिनी आहे. शिवाय वेलिंगकर इन्स्टिट्युटमधून मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चचेही ती धडे गिरवत आहे..
वर्षभरापूर्वी सोनम आणि जुनैदची भेट झाली होती. तेव्हापासून हे दोघे डेटिंग करत आहेत. विशेष म्हणजे जुनैदने सोनमची भेट त्याचे वडील अर्थात आमिर खानबरोबर करुन दिली आहे.
जुनैद आता अठरा वर्षांच्या असून तो फिल्म मेकिंगचे धडे गिरवत आहे. वडिलांप्रमाणे अभिनयात त्याला विशेष रुची नाहीये. सध्या जुनैद आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'पीके' या सिनेमासाठी राजकुमार हिरानी यांना असिस्ट करत आहे.
असो, जुनैदने आपल्यासाठी भावी जोडीदाराची निवड केलीय. सगळे काही जुळून आल्यास आमिर खान सोनम वर्माचे भावी सासरेबुवा होतील, असंच दिसतंय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा जुनैदची त्याच्या गर्लफ्रेंडबरोबरील खास छायाचित्रे. याशिवाय जाणून घ्या त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल...