आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासे वाचवण्यासाठी रिचा चढ्ढाने केले फोटोशुट, बघा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्री रिचा चढ्ढा पेटा (पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स)सोबत जोडली गेली आहे. तिने मासे वाचवण्यासाठी पेटासाठी फोटोशुट केले आहे. या फोटोशुटच्या दरम्यान ती स्वत: जलपरिच्या लूकमध्ये दिसली. रिचाचे म्हणणे आहे, की मासे आपले मित्र आहेत म्हणून त्यांना खाऊ नये. यासाठी तिने पेटासाठी मासे वाचवण्यासाठी फोटोशुट केले आहे.
रिचा या फोटोशुटवेळी जलपरीच्या अवतारात दिसली. हिरव्या आणि गुलाबी रंगाचा तिने जलपरिसारखा दिसणारा ड्रेस परिधान केला होता. तिच्या हातात 'fish are friends, not food' लिहलेले बोर्ड होता.
'गँग्स ऑफ वासेपुर' सिनेमासाठी फिल्मफेअर अवॉर्ड जिंकणा-या रिचाने पहिल्यांदा पेटासाठी फोटोशुट केले आहे. पेटासोबत अनेक बॉलिवूड स्टार्स सध्या जोडलेले आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पेटाने अभिनेता इमरान खानसोबतला सन्मानित केल होते. सिनेमाच्या सेटवर ट्रेनर एका कुत्र्याला मारत असताना इमरानने त्याला अडवले होते. पेट प्राण्यांचे संरक्षणाचे काम करते.
मासे वाचवण्यासाठी रिचाने कसे केले फोटोशुट बघाण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...