आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाच्या प्रीमिअरला ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये अवतरली पूनम, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हॉलिवूड सिनेमांचे क्रेज बॉलिवूडमध्येही बरेच आहे. भारतीय कलाकार हॉलिवूड सिनेमांचे चाहते आहेत. अलीकडेच पुन्हा एकदा याचे उदाहरण बघायला मिळाले. पीव्हीआर पिक्चर्स आणि योगेश लाखानी यांनी 'रिडीक' या आगामी हॉलिवूड सिनेमाचा प्रीमिअर आयोजित केला होता. वर्सोवा येथील सिनेमॅक्समध्ये विन डिसेल यांच्या या सिनेमाच्या प्रीमिअरला होता. येथे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपली हजेरी लावली. याशिवाय टीव्ही स्टार्सनीही या प्रीमिअरला आपली उपस्थिती लावली.
डॉली बिंद्रा आणि तिचे पती, मॉडेल उर्वशी आणि तिचा मित्र मोहित, भाग्यश्री आणि तिचे पती हिमायल या प्रीमिअरला दिसले. याशिवाय राजेश खट्टर आणि वंदना, शरबानी कश्यप आणि तिचे पतीसुद्धा हा सिनेमा एन्जॉय करताना दिसले.
या सर्वांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली ती पूनम पांडे. ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये पूनम येथे आली होती. एकीकडे लोकांचे लक्ष सिनेमाच्या वैशिष्ट्यांवर होते, तर दुसरीकडे पूनमने आपल्या हॉट अंदाजाने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला.
छायाचित्रांमध्ये बघा 'रिडीक' या सिनेमाच्या प्रीमिअरची खास झलक...