आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या करिअरसाठी वडिलांची जिद्द..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळी कलावंतांना स्थापित करणारे रिक्कू राकेश नाथ त्यांचा मुलगा करणला बॉलिवूडमध्ये स्थापित करण्यासाठी नको ते प्रयत्न करत आहेत. करणचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला होता. तरीसुद्धा हिंमत न हारता ते तिसर्‍या चित्रपटाची तयारी करताहेत.
स्टारडम वारशात मिळत नाही याचे अनेक उदाहरण बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतात. करण नाथसोबतदेखील असेच काही होत आहे. करण 80-90 च्या दशकात चित्रपट इंडस्ट्रीतील मोठे नाव असलेल्या रिक्कू राकेश नाथ यांचा मुलगा आहे. रिक्कू मोठ्या कलावंतांच्या सचिवाचे काम करत होते. बॉलिवूडमध्ये त्यांचे वर्चस्व होते. माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची कारकीर्द चमकवण्यात रिक्कू यांचा मोठा वाटा आहे. मात्र मावळत्या स्टारडममुळे सगळे मोठे कलावंत त्यांची साथ सोडून गेले. आता परिस्थिती अशी झाली आहे की, रिक्कू, करणच्या करिअरसाठी काही करू शकत नाहीत.
करणने 9 वर्षांपूर्वी ‘पागलपन’ सिनेमातून इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. मात्र तो फ्लॉप ठरला. त्यानंतर लेखक-दिग्दर्शक अनीस बज्मीसोबत रिक्कू यांनी मुलाला पुन्हा इंडस्ट्रीत स्थापित करण्यासाठी चित्रपट बनवला. अमिषा पटेल आणि ग्रेसी सिंहसोबत ‘दिल धडके बार-बार’ नावाने सिनेमा सुरू केला. 80 टक्के शूटिंग झाल्यानंतर काही कारणास्तव तो बंद झाला. आता पुन्हा रिक्कू आपल्या मुलासाठी ‘गँग्स ऑफ बनारस’ सिनेमाची निर्मिती करत आहेत. सध्या इंडस्ट्रीत रणबीर कपूर, रणवीर सिंह आणि अर्जुनसारख्या नवोदित कलावंतांची गर्दी असताना आपल्या मुलाला रिक्कू स्थापित करू शकतात की नाही, हे तर वेळच सांगेल.