आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Happy Anniversary : महाराष्ट्रीयन आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाले होते रितेश-जेनेलिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनई-चौघड्यांचा निनाद, शाही मराठमोळ्या पद्धतीने वराती मंडळीने बांधलेले फेटे, राजकारणातील दिग्गज मंडळी आणि बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या उपस्थितीत लव्हबर्ड रितेश आणि जेनेलिया 3 फेब्रुवारी 2012 रोजी दुपारी 12 वाजून 48 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर लग्नगाठीत अडकले होते. आज रितेश आणि जेनेलिया आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत.
2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाद्वारे या जोडीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. आठ वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले.
रितेश-जेनेलियाच्या शाही विवाह सोहळ्याला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प्रफुल्ल पटेल, अजय देवगण, काजोल, अभिषेक बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, करण जोहर, आशुतोष गोवारीकर यांच्यासह अनेक राजकारणी आणि दिग्गज कलाकार उपस्थित होते. रितेश आणि जेनेलिया महाराष्ट्रीय आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठीत अडकले होते.
आज रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या लग्नसोहळ्याची खास छायाचित्रे दाखवत आहोत... पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा रितेश-जेनेलियाचा WEDDING ALBUN...