आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ritesh, Saif Ali Playing Three Role In Sajid Khan Film

साजिद खानच्या ‘हमशकल’मध्‍ये रितेश, सैफ अली तिहेरी भूमिकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अजय देवगणला घेऊन ‘हिम्मतवाला’चा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर दिग्दर्शक साजिद खान पुन्हा एकदा कॉमेडी चित्रपटाकडे वळला आहे. त्याच्या आगामी ‘हमशकल’ या चित्रपटात सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर तिहेरी भूमिकेत दिसतील. पुढील वर्षी जून महिन्यात हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


साजिदने 2006 मध्ये ‘डरना जरुरी है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर 2007 मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, फरदीन खान आणि विद्या बालन यांना घेऊन ‘हे बेबी’ हा चित्रपट केला. या चित्रपटाने साजिदच्या करिअरला ख-या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर त्याने ‘हाऊसफुल’ हा चित्रपट केला. या चित्रपटानेही भरमसाट कमाई केली. त्यामुळे पुन्हा या चित्रपटाचा सिक्वेल केला. हा चित्रपटही तुफान चालला. यानंतर मात्र त्याने आपला कॉमेडी अंदाज सोडून अजय देवगणला घेऊन ‘हिम्मतवाला’ची पुन्हा निर्मिती केली.

मात्र, या चित्रपटाने सर्वांचीच निराशा केली. त्यामुळे पुन्हा एकदा तो कॉमेडी चित्रपट बनवत आहे. काही दिवसांपूर्वी साजिदने ‘हमशकल’ या चित्रपटाची कथा लिहून पूर्ण केली आहे. यात त्याने रितेश, सैफ आणि छोट्या पडद्यावरील राम कपूर यांना साइन केले आहे. चित्रपटात कधीही न पाहिलेल्या लोकेशन्सची निवड करण्यात आली आहे. रितेशने मराठीत ‘बालक पालक’ (बीपी) चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर हिंदीत तीन चित्रपट साइन केले आहेत.


जॅकलिनसोबत नाते नाही
2010 मध्ये आलेल्या ‘हाऊसफुल’ या चित्रपटात साजिदने श्रीलंकन अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस हिला ‘ओ धन्नो’ या आयटम साँगमधून ब्रेक दिला. त्यानंतर साजिद आणि जॅकलिन यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, तीन वर्षातच त्यांचे नाते संपुष्टात आले. जॅकलिन चांगली अभिनेत्री आहे. मात्र, तिच्यासोबत आता माझे कसलेही नाते नसल्याचा खुलासा साजिदने केला आहे.