आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कादर खान स्‍वतः समोर येऊन म्‍हणाले \'मी जिवंत आहे\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडचे प्रसिद्ध चरित्र अभिनेते कादर खान यांच्‍या निधनाची अफवा उडाली. सोशल मिडियावर कादर खान यांच्‍या निधनाची बातमी वा-यासारखी पसरली आणि चाहते त्‍यांना श्रद्धांजली अर्पण करु लागले. अखेर कादर खान यांनी स्‍वतः माध्‍यमांसमोर येऊन सांगितले, मी जिवंत आहे.

शुक्रवारी सकाळपासून सोशल मिडियावर कादर खान यांच्‍या मृत्‍यूची बातमी पसरली. लोकांनी त्‍यांना श्रद्धांजलीही अर्पण केली. काही मनोरंजन वाहिन्‍यांनी खातरजमा न करता बातमी प्रसारित केली. अफवा पसरल्‍यामुळे कादर खान आणि त्‍यांचे कुटुंबिय त्रस्‍त झाले. काही जणांनी कादर खान यांना दुरध्‍वनीवरुन संपर्क केला. त्‍यावेळी त्‍यांना कादर खान यांचा परिचित आवाज ऐकू आला. अफवेबाबत माहिती मिळाल्‍यानंतर कादर खान प्रसार माध्‍यमांसमोर येऊन स्‍वतःच्‍या मृत्‍यूची बातमी म्‍हणजे केवळ अफवा असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. कादर खान म्‍हणाले, प्रत्‍येकालाच एका दिवशी जायचे आहे. मी जाताना प्रेक्षकांचे प्रेम घेऊन जाईन. परंतु, अशा प्रकारे अफवांनी कुटुंबियांना त्रास होतो. त्‍यामुळे अफवा पसरवू नका, असे आवाहन त्‍यांनी केले.

काही वाहिन्‍यांनी खातरजमा केल्‍याशिवाय कादर खान यांच्‍या निधनाची बातमी दाखविणे सुरु केले होते. त्‍यामुळे त्‍यांना माफीही मागावी लागली.


कादर खान यांनी आतापर्यंत सुमारे 300 चित्रपटांमध्‍ये अभिनय केला आहे. एक कसलेले आणि दर्जेदार अभिनेते म्‍हणून त्‍यांची ओळख आहे. खलनायक ते हास्‍य कलावंतापर्यंत अनेक प्रकारच्‍या भूमिका त्‍यांनी केलया आहेत. याशिवाय दर्जेदार संवाद लेखक म्‍हणूनही त्‍यांनी सिनेसृष्‍टीत ओळख निर्माण केली आहे.

त्‍यांनी मुक्ति, ज्वालामुखी, मेरी आवाज सुनो, जमाने को दिखाना है, सनम तेरी कसम, नौकर बीबी का, शरारा, कैदी, घर एक मंदिर, गंगवा, जान जानी जर्नादन, घर द्वार, तबायफ, पाताल भैरवी, इंसाफ की आवाज, स्वर्ग से सुंदर, वतन के रखवाले, खुदगर्ज, खून भरी मांग, आंखे, शतरंज, कुली नंबर वन, जुड़वा, हीरो नंबर वन, बड़े मियां छोटे मियां, सूर्यवंशम, हसीना मान जाएगी, फंटूश इत्‍यादी चित्रपटांमध्‍ये काम केले आहे.