आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्याच्या प्रेग्नेंसीची गोष्ट निघाली खोटी, वजन कमी करण्यात बिझी आहे ही 'उलाला गर्ल'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय सिनेसृष्टीत अनेकदा असं घडलंय की स्टार्स मीडियासमोर काही वेगळेच बोलतात, मात्र त्यांच्या बोलण्याचा दुसराच अर्थ लावला जातो. जर एखादी सेलिब्रिटी रुग्णालयात गेली आणि तिने मीडियाला त्यामागचे कारण सांगितले नाही तर अनेक तर्कवितर्क लढवले जातात.
अलीकडेच बॉलिवूडची 'उलाला गर्ल' अर्थातच विद्या बालन हिच्याविषयीदेखील असंच काहीसं घडलंय. मंगळवारी विद्या मुंबईतील एका रुग्णालयात गेली होती. तेथून बाहेर पडल्यानंतर ती मीडियाशी काहीही न बोलताच निघून गेली. त्यामुळे अनेक न्यूज वेबसाइट्सनी विद्या बालन प्रेग्नेंट असल्याची बातमी प्रकाशित केली.
मुंबईतील एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ''विद्या अंधेरीस्थित एका प्रसिद्ध रुग्णालयात गेली होती. जेव्हा तिला यामागचे कारण विचारले गेले, तेव्हा तिने मौन बाळगले. तिला यामागचे कारण सांगायचे नव्हते. तिच्यासोबत यावेळी तिच्या कुटुंबातील काही सदस्यदेखील हजर होते.'' या वृत्तानंतर विद्या प्रेग्नेंट असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला.
जेव्हा आम्ही विद्याच्या मॅनेजरशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी हे सर्व अंदाज चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटले, ''विद्या प्रेग्नेंट नाहीये. ती आपल्या आागामी सिनेमातील भूमिकेसाठी वजन कमी करत आहे. त्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा केवळ अफवाच आहे.'' असो, याविषयी विद्या अद्याप तरी काहीही बोलण्यास तयार नाहीये.
पुढील स्लाईड्समध्ये आम्ही तुम्हाला विद्याच्या पर्सनल आयुष्याविषयी सांगत आहोत...