आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupesh Paul Files A Complaint Against Sherlyn Chopra

खोटं बोलतेय शर्लिन, रुपेशजवळ आहे पुरावा, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कामसूत्र 3डी'चा दिग्दर्शक रुपेश पॉलने अभिनेत्री शर्लिन चोप्राला सडेतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच, शर्लिनने रुपेशच्या विरुध्द लैंगिक शोषणचा आरोप लावला होता. या प्रकरणाविषयी तिने सांताक्रूज पोलिस स्टेशनच्या अतिरिक्त आयुक्त विश्वास नागरे पाटील आणि वरिष्ठ निरीक्षकांना पत्र लिहले होते. तसेच रुपेशनेसुध्दा केरळच्या पोलिस स्टेशनमध्ये शर्लिनच्या विरोधात कलम 154च्या अंतर्गत असहकार्य, गैरवर्तणुक आणि फसवणूकिची तक्रार दाखल केली आहे.
शर्लिनने लावलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देताना रुपेश म्हणाला, 'माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत, माझ्याजवळ या गोष्टीचा पुरावा आहे. मला वाटते, की 5 कोटींची नुकसान भरपाईच्या कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ती असे चुकीचे आरोप माझ्यावर लावत आहे. तिला नोटिस पाठवून दहा दिवस उलटले आहेत. त्या पासून बचाव करण्यासाठी ती हे सर्व काही करत आहे.' रुपेश पॉलने सांगितले, की शर्लिनला तिचे मानधन देण्यात आले असून माझ्याकडे तिच्या स्वाक्षरी केलेले कागदपत्र आहेत. डबिंगनंतरचे 7 लाख रुपये देणे हे खरे आहे. तिला यासाठी संपर्क करण्यात आला होता परंतु ती आली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या रुपेशने शर्लिनवर कोण-कोणते आरोप लावले...?