आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने चित्रपट निर्माते सुधाकर बोकाडे यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1991 साली सुपरहिट ठरलेल्या 'साजन' सिनेमाचे निर्माते सुधाकर बोकाडे यांचे रविवारी (7 जुलै) रात्री निधन झाले. हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परीवार आहे. ओशीवारा स्थित स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून ते दाखल होते.

सुधाकर बोकाडे यांची मुलगी दिव्या बोकाडे यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले की, सुधाकर बोकाडे यांना दोन दिवसांपूर्वी म्हणजे 6 जुलैला हृद्यविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दोन दशकांहून अधिक काळ चित्रपट उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुधाकर यांनी एकुण 17 सिनेमांची निर्मिती केली होती. साजन, सपने साजन के, प्रहार, सौदा, धनवान, कन्यादान, कलिंगा आणि ये प्यार ही तो है, हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत.