आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar At Asha Bhonsle's Mai Music Launch

PHOTOS : 'माई'च्या म्युझिक लाँचला पत्नीसह पोहोचला सचिन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायिका आशा भोसले आता आपल्या सेकंड इनिंगला सुरुवात करत आहे. आशाताईंची ही सेकंड इनिंग अभिनयाच्या क्षेत्रातील आहे. 'माई' या सिनेमाद्वारे आशाताई पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत. अलीकडेच त्यांच्या पहिल्या सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. खास गोष्ट म्हणजे आशाताईंच्या सिनेमाचे म्युझिक लाँच सचिन तेंडुलकरच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला सचिनची पत्नी अंजलीही हजर होती.

सचिनने यावेळी आशाताईंचे कौतुक करताना म्हटले की, ''आशाताईंची गाणी ऐकून मी लहानाचा मोठा झालो. आशाताईंचे 'उमराव जान' सिनेमातील 'इन आँखो की मस्ती में...' हे माझे आवडते गाणे आहे. त्यांनी एकदा हे गाणे माझ्या आणि अंजलीसाठी गायले होते.''

पाहा या कार्यक्रमाची ही खास छायाचित्रे...