आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : बघा क्रिकेटचा देव सचिनबरोबरचे बॉलिवूड सेलिब्रिटींचे अविस्मरणीय क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आपली निवृत्ती जाहीर केली आणि समस्त क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. सचिनला भविष्यात मैदानावर खेळताना बघता येणार नाही, याचे दुःख त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे.
सध्या सचिन मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आपली शेवटची 200 वी टेस्ट मॅच खेळतोय. त्याला चिअरअप करण्यासाठी आमिर खानसह काही सेलिब्रिटी वानखेडे स्टेडिअमवर हजर आहेत.
सोशल नेटवर्किंग साईट्सवर सचिनच्या चाहत्यांनी त्याच्यावरचे प्रेम व्यक्त केले आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोप-यात सचिनचे चाहते हजर आहेत. मग ते अगदी सामान्य लोक असोत किंवा बॉलिवूडचे नावाजलेले सेलिब्रिटी, प्रत्येक जण सचिनेचा दिवाना आहे.
बॉलिवूडमध्ये सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, जॉन अब्राहम, आमिर खान, अमिताभ बच्चन या सर्व सेलिब्रिटींचे सचिन तेंडुलकरबरोबर मैत्रीचे संबंध आहेत.
सचिन तेंडुलकरला बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...