आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका, सैफीनाला गोव्याचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकसचिन तेंडुलकर, दीपिका पदुकोण, सैफ अली खान आणि करीना कपूर खान या सर्वांना गोवा सरकारने आपला ब्रँड अँम्बेसेडर बनवण्यास नकार दिला आहे.

आपल्या राज्याचे प्रमोशन करण्यासाठी त्यांना कोणत्याही कलावंताची गरज नसल्याचे सरकारने म्हटले आहे. हे सर्व सेलिब्रिटी गोव्याच्या ब्रँड अँम्बेसेडरच्या यादीत सामील होत्या.

गोव्याचे पर्यटन मंत्री दिलीप परूलेकर म्हणाले की, गोवा राज्याची स्वत:च कलावंतांप्रमाणे ख्याती आहे. कोणताही टुरिस्ट भारत भ्रमणावर आल्यास गोव्यालाच प्राथमिकता देतो. त्यामुळे आम्हाला कोणत्याही सेलिब्रिटीला ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवडण्याची गरज भासत नाही. त्यांच्या विभागाकडे दीपिका पदुकोण, सचिन तेंडुलकरसह सैफ अली खान आणि करीना कपूरच्या मार्केटिंग एजन्सीकडून गोव्याचा ब्रँड अँम्बेसेडर बनवण्या बाबत प्रस्ताव आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले. या सगळ्यांना त्यांनी नकार दिला आहे. काही वर्षांपूर्वी गोव्याने प्राची देसाईला आपले ब्रँड अँम्बेसेडर बनवले होते.