आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan Not Intrested To Do Film With Kareena

...आणि करीनाबरोबर रोमान्स करण्यास सैफचा नकार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवाब सैफ अली खानने घेतला आहे एक निर्णय. आता म्हणे सैफने करीनाबरोबर चक्क सिनेमांमध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

त्याचे झाले असे की, गेल्या काही दिवसांत सैफ आणि करीनाने एकत्र जे सिनेमे केले ते सगळे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. टशन, कुर्बान आणि एजंट विनोद हे सिनेमे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या सिनेमांमधली सैफ-करीनाची केमिस्ट्री प्रेक्षकांना काही रुचली नाही. त्यामुळे सैफने करीनाबरोबर काम करण्यास नकार दिला आहे.
सैफच्या मते, ''रिअल लाईफमध्ये आम्ही एकत्र असताना सिनेमांमध्ये एकत्र काम करण्याची गरज मला भासत नाही. रिअल लाईफमध्ये सोबत असताना रिल लाईफवर केमिस्ट्री जुळून येत नाही.''

आता सैफला हे उशीरा सुचलेले शहाणपण म्हणावे की अजून काही हे त्याचे त्यालाच ठाऊक.