आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan To Star In Raees With Shahrukh Khan

शाहरुखसह 'रईस'मध्ये काम करणार सैफ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता फरहान अख्तर आता आपल्याच सिनेमातून बाहेर पडतोय आणि त्याला कारणीभूत ठरला आहे शाहरुख खान. झालं असं, की गेल्या वर्षी 'हॅपी न्यू इयर' या सिनेमाच्या सेटवर शाहरुख जखमी झाला होता. त्यामुळे त्याचे शुटिंग शेड्युल पुढे सरकले. यामध्ये आगामी 'रईस' या सिनेमाचाही समावेश आहे. हा सिनेमा फरहान अख्तरच्या एक्सल एन्टरटेन्मेंटच्या बॅनरमध्ये तयार होतोय. या सिनेमात शाहरुख गुजराती डॉनच्या भूमिकेत असून फरहान पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार होता. मात्र शाहरुखने दिलेल्या तारखा पुढे सरकल्यामुळे फरहानच्या आगामी सिनेमांचे शेड्युल बिघडले.
फरहानला बिजॉय नाम्बियार दिग्दर्शित आणि अद्याप नाव न ठरलेल्या सिनेमाचे शुटिंग सुरु करायचे आहे. शिवाय त्याच्या हातात झोया अख्तरचा एक सिनेमा आणि देव बेनेगलचा 'बॉम्बे सामुराई' हा सिनेमासुद्धा आहेत. त्यामुळे आता फरहानकडे 'रईस' या सिनेमासाठी तारखा उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे त्याने या सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
फरहानने सिनेमाकडे पाठ फिरवल्यामुळे शाहरुखला या सिनेमात एक दमदार अभिनेता हवा आहे आणि म्हणूनच त्याने सैफच्या नावाचा विचार सुरु केला आहे. सैफसोबत या सिनेमाविषयी तशी बातचीतसुद्धा झाली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बातचीत आता अंतिम टप्प्यात आहे. सर्व काही सुरळीत जुळून आल्यास सैफ शाहरुखसह एका सिनेमात झळकेल.