आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहाला सैफचा सल्ला; ‘40 व्या वर्षी लग्न कर’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शर्मिला टागोर यांची कन्या आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोहा अली खान हिला तिच्या मोठ्या भावाने म्हणजेच सैफ अली खानने अजब सल्ला दिला आहे. लग्नासाठी 40 वर्षे हे योग्य वय असल्याचे सैफने तिला सांगितले आहे.


सोहा सध्या अभिनेता कुणाल खेमू याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नवीन घरात प्रवेश केला असून तेथे ते दोघे एकत्र राहतात. मात्र, सध्या तरी या दोघांनी लग्नाच्या बाबतीत विचार केलेला नाही. माझी आई रोज मला लग्न करण्यासाठी आग्रह करत असते. पण मी ते फार गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे मी लग्नासाठी तयार व्हावे म्हणून आईने सैफला मला समजावण्याची जबाबदारी दिली. मात्र, सैफने आपल्याला 40 वर्षे हेच लग्नासाठी योग्य वय असल्याचे सांगितल्याचे सोहा म्हणाली.