आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साजिद-फरहादची जोडी दिग्दर्शनात यशस्वी होईल का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगला संपादक चांगला दिग्दर्शक होऊ शकतो, असे फिल्म इंडस्ट्रीत म्हटले जाते. दुसरीकडे पटकथा लेखनाशी जोडलेल्या लेखकांना चांगला दिग्दर्शक मानले जात नाही. तरीसुद्धा लेखकांना दिग्दर्शक होण्याची लवकर संधी मिळते.

त्यामुळेच ‘गोलमाल’ आणि ‘हाऊसफुल’ श्रृंखलेची पटकथा लिहिणार्‍या साजिद-फरहाद जोडीने दिग्दर्शन क्षेत्रात उडी मारली आहे. त्यांनी अक्षय कुमार आणि तमन्ना यांना घेऊन आपल्या पहिल्या ‘एंटरटेन्मेंट’ सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे. मार्च 2014 पर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

खरं तर राज कपूरच्या काळापासूनच पटकथा लेखकांनी दिग्दर्शनात भाग्य आजमावले आहे. के. ए. अब्बास यांनी आरके बॅनरसाठी ‘आवारा’, ‘श्री 420’, ‘बॉबी’, ‘हिना’ इत्यादी कथा लिहिल्यानंतर सिनेमे बनवले. गीतकार गुलजारने पटकथा लेखनाबरोबरच ‘खुबसूरत’, ‘लेकिन’, ‘इजाजत’ सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले. अनिस बज्मी 12 सिनेमा लिहिल्यानंतर दिग्दर्शक बनले आणि ‘वेलकम’, ‘नो एंट्री’, ‘सिंह इज किंग’ सारखे सिनेमे बनवले. या दिग्दर्शकांचे काही सिनेमे फ्लॉपसुद्धा झाले. तर मग पाहू साजिद-फरहाद जोडीला दिग्दर्शन क्षेत्रात किती यश मिळते.