आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीतकार साजिद-वाजिद यांना पितृशोक, सांत्वन करायला पोहोचले सेलिब्रिटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिद यांचे वडील उस्ताद शराफत खान यांचे 3 जुलै रोजी निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. शराफत यांची प्रकृती ठीक नसल्याने मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मागील काही दिवसांपासून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेण्यात आले होते. अखेरीस बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शराफत अली खान हे एक कुशल तबला वादक होते. अनेक सिनेमांचे संगीत दिग्दर्शन करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे.

शराफत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार पोहोचले होते. साजिद खान, अरबाज खान आणि आदित्य पांचोलीसह अनेक कलाकार त्यांच्या अंत्य यात्रेत सहभागी झाले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा साजिद-वाजिद यांच्या वडिलांची अंत्ययात्रा...