Home »Top Story» Salama Bring Shera's Son In Flim

PHOTOS : बॉडीगार्ड शेराच्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करणार सलमान

वृत्तसंस्था | Feb 16, 2013, 10:59 AM IST

मुंबई - आजवर अनेक नवोदित कलाकारांना बॉलिवूडचे दार उघडून देणारा ‘दबंग’खान सलमानने आता आपला बॉडीगार्ड असलेल्या शेराचा मुलगा टायगरलाही चित्रपटसृष्टीत आणण्याचे ठरवले आहे. खुद्द सलमान व शेरा यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

गेली अनेक वर्षे बॉलिवूडच्या माध्यमातून असंख्य तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला सलमान सामाजिक जबाबदारीही पार पाडत असल्याचे आजवरच्या घटनांमधून दिसून आले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून शेरा नामक अंगरक्षक या ‘बॉडीगार्ड’चे संरक्षण करत आहे. आपल्याकडे काम करत असलेल्या कर्मचा-याकडेही तितक्याच सहानुभूतिपूर्वक लक्ष देत असतो. शेराचा 20 वर्षीय मुलगा टायगरला सलमानने ‘बॉडीगार्ड’ चित्रपटातील एका गाण्यात अभिनेत्री कतरिना कैफबरोबर पडद्यावर झळकण्याची संधी मिळवून दिली होती. आता त्याला घेऊन एक चित्रपट करण्याचाच सलमान विचार करत आहे.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा टायगरची छायाचित्रे...

Next Article

Recommended