आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिल्ड अवॉर्डमध्ये सलमानने केवळ शाहरुखचीच नव्हे तर चक्क अभिषेकचीही घेतली गळाभेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'जय हो' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अलीकडेच मुंबईत आयोजित झालेल्या गिल्ड अवॉर्ड्स सोहळ्यात सलमानने आपल्या सिनेमा चर्चेत आणण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. या अवॉर्ड सोहळ्याचा तो होस्ट होता.
या शोमध्ये सलमानने त्याचा कट्टर शत्रू शाहरुखची चक्क गळाभेट घेतली. रंजक गोष्ट म्हणजे या अवॉर्ड सोहळ्यात सलमानने केवळ शाहरुखचीच नव्हे तर अभिषेक बच्चनचीही गळाभेट घेतली. खरं तर सलमान आणि अभिषेक यांच्यात मैत्री नाही. याचे कारण म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. सलमान आणि ऐश्वर्याचे एकेकाळी अफेअर होते आणि त्यांच्या नात्याचा शेवट दुःखद झाला होता. तेव्हापासून सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात बोलणे बंद आहे.
बच्चन कुटुंबातील केवळ एकच व्यक्ति म्हणजे अमिताभ बच्चन सलमानला भेटताना दिसतात. ऐश्वर्यामुळे अभिषेक सलमानकडे दुर्लक्ष करायचा, मात्र या अवॉर्ड सोहळ्यात हे दोघे मित्रांसारखी गळाभेट घेताना दिसले. यावरुन सलमानने नवीन वर्षात शाहरुख आणि अभिषेककडे मैत्रीचा हात पुढे केला, असं म्हणायला हरकत नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा सलमान-अभिषेकची हसत गळाभेट घेतानाची ही खास छायाचित्रे...