आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • "Salman Bhai Has A Phobia About Women In Drag” Says Comedian Ali Asgar

'दादी'ने केला खुलासा, अखेर सलमानने का घेऊ दिले नाही चुंबन ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्माचा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा शो छोट्या पडद्यावरील सर्वाधिक टीआरपी मिळवणारा शो ठरला आहे. या शोमध्ये काम करणा-या सर्वच कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. आता कपिलला 'बिट्टू', सुमोना चक्रवर्तीला 'मिसेस बिट्टू शर्मा', किकू शारदाला 'पलक' आणि अली असगरला सर्वजण 'दादी' या नावाने ओळखतात.
दादीची भूमिका साकारणारा अभिनेता अली असगरच्या करिअरला या शोच्या माध्यमातून एक नवीन दिशा मिळाली आहे. अलीकडेच अलीने चित्रपट समीक्षक सुभाष के झा यांच्याशी बातचित केली. यावेळी अलीने काही खास गोष्टी शेअर केल्या...
अली असगरने सांगितले, 'मी विनोदी अभिनेत्याच्या रुपात करिअरला सुरुवात करुन 27 वर्षे लोटली आहे. मात्र एवढ्या वर्षांत कपिलच्या शोमधील 'बिट्टू की दादी'च्या भूमिकेने मला पहिल्यांदा वेगळी ओळख मिळवून दिली आहे.'
या शोचे वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडमधील प्रत्येक स्टार आपल्या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने शोमध्ये हजेरी लावत असतो. त्यावेळी दादी त्यांना शगुन म्हणून किस करत असते. त्यापैकी अनेक स्टार्स तिला गालाऐवजी हातावरच किस घेऊ देतात.
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये जेव्हा सलमान खान 'जय हो'च्या प्रमोशनच्या निमित्ताने आला होता, तेव्हा असेच काहीसे दृश्य बघायला मिळाले होते. सलमानने दादीला किस करु दिले नव्हते. याविषयी सुभाष के झा यांनी अलीला विचारले तेव्हा तो म्हणला, की स्त्रिया आपल्याला ओढून घेतील अशी अनामिक भीती सलमान भाईला वाटते.
अली असगरने सलमानविषयीचे आणखी कोणते रहस्य उघड केले, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...