आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडेच गंभीर आजाराने त्रस्त एका तरुणाने सलमान खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. सलमाननेदेखील आपले सर्व काम सोडून त्या तरुणाची इच्छा पूर्ण केली.
सलमान आपल्या ह्युमन बिइंग एनजीओद्वारे लोकांची मदत करतच असतो. मात्र, या वेळेस त्याने एका युवकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या शेड्युलमध्ये बदल केला. पनवेल, मुंबईत राहणार्या एका युवकाने जीवनाच्या शेवटच्या दिवसांत सलमानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. लवासामध्ये शूटिंग करणार्या सलमानने इच्छेचा मान राखत त्याला लवासामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मात्र, युवकाच्या घरून संदेश आला की, आजारी मुलाला इतक्या दूर घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे एसी कार नाही. हे ऐकताच दबंग खानने त्या युवकाला सेटपर्यंत आणण्यासाठी चार्टर फ्लाइटची व्यवस्था केली. मात्र, ऐनवेळेवर तरुणाची तब्येत बिघडल्यामुळे भेट होऊ शकली नाही. मात्र, सलमान विसरणार्यांपैकी नाही. तीन दिवसांनंतर पनवेलजवळ एम्युजमेंट पार्क इमेजिकाच्या आपल्या भेटीत सलमानने या खास चाहत्याला बोलावून घेतले. त्या तरुणासोबत जेवण करून त्याला आपल्या गाडीतून घरी सोडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.