आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडजात्यांच्या सिनेमाचे सॅटेलाइट अधिकार सलमानकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानच्या स्टार समूहाशी झालेल्या करारामुळे रार्जशीच्या या चित्रपटाचे सॅटेलाइट अधिकार झी समूहाला मिळणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत सलमान खानची भूमिका असलेल्या सूरज बडजात्यांचा ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमाच्या सॅटेलाइट अधिकाराबाबत चर्चा होती. खरे तर, रार्जशी बॅनरचे बडजात्या गेल्या 15 वर्षांपासून झी समूहाशी जुळलेले असून सुभाष चंद्रांसोबत त्यांचे कौटुंबिक संबंधही आहेत. यामुळे सिनेमाचे सॅटेलाइट अधिकार झीच्या खात्यात जाण्याची चर्चा झाली होती.
सिनेमाचा अभिनेता सलमान खानच्या स्टार चॅनेलसोबत काही वर्षांपूर्वी झालेल्या करारानुसार त्याचा सिनेमा टीव्हीवर दाखवण्याचे अधिकार स्टार ग्रुपला मिळणार आहेत. बडजात्या आणि सलीम खान यांच्या कुटुंबांतील जुने संबंधदेखील यामागील एक कारण असू शकते. कोट्यवधींच्या या व्यवहारात बडजात्यांचा लाडका असलेल्या सलमानच्या बाजूनेच निर्णय होणार होता. सिनेमाबाबत तयार होणार्‍या मसुद्यादरम्यान बडजात्या आणि सलमानचे वडील सलीम खान यांच्यात बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर सलमान खानकडे सॅटेलाइटचे अधिकार सुरक्षित राहतील, असा निर्णय घेण्यात आला. म्हणजेच हा सिनेमा स्टार चॅनेलच प्रसारित करेल.