आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Is Not Getting Married To Lulia Says Brother In Law Atul

भावोजीने केला खुलासा, 'सलमान नाही करणार लुलियासोबत लग्न'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड दबंग सलमान खान सध्या सिनेमांपेक्षा त्याच्या लग्नाच्या चर्चांनी प्रसिध्दीझोतात आहे. बॉलिवूडपासून ते सलमानच्या चाहत्यांपर्यंत हीच चर्चा आहे, की सलमान यावर्षीच्या शेवटी त्याची एक्स गर्लफ्रेंड लुलिया वंटूरसोबत लग्नगाठीत अडकण्याची शक्यता आहे. परंतु सलमानचा भावोजी अतुल अग्निहोत्रीच्या सांगण्यानुसार, सलमान लुलियासोबत लग्न करणार नाहीये.
जेव्हा दिव्य मराठी डॉट कॉमने अतुलला विचारले, की सलमान खरंच लुलियासोबत लग्न करणार आहे काय? यावर त्याने हसून उत्तर दिले, 'कुणी सांगितले, सलमान लुलियासोबत लग्न करणार आहे. ती त्याची चांगली मैत्रीण आहे आणि ते एकमेकांना भेटतात म्हणजे ते लग्न करणार आहेत असे नाही.'
अतुल पुढे म्हणतो, 'सलमानचे लग्न एक सार्वजनिक विषय बनत चालला आणि माझ्या मते सलमान सध्यातरी लग्न करणार नाही.'
लुलियाविषयी सांगताना अतुल म्हणतो, 'लुलिया माझ्या 'ओ तेरी' सिनेमात आयटम साँग करताना दिसणार आहे. ती खूप हुशार आहे. ती एक चांगली अभिनेत्री, डान्सर आणि गायिका आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सलमान आणि लुलिया यांच्या लग्नाच्या चर्चेला कशी झाली सुरूवात?