आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2014चीच नव्हे तर सलमान खानने बुक केली 2015ची ईद... दीपिकासह करणार रोमान्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या बीइंग ह्युमन बॅनरखाली बनत असलेल्या नव्या चित्रपटासाठी सलमानने दोन वर्षांपूर्वीच चित्रपटगृहे बुक केली आहेत. सलमान खान अभिनीत आणि सोहेल खान दिग्दर्शित ‘जय हो’ जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर जून 2015 मध्ये त्याचा नाव न ठरलेला चित्रपट प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत चित्रपट प्रदर्शनासाठी दिवाळी मोठी संधी समजली जात होती. मात्र, सलमान खानने आपले चित्रपट ईदला प्रदर्शित केले. ‘वाँटेड’, ‘बॉडीगार्ड’ आणि ‘एक था टायगर’बाबत त्याला प्रत्येक वेळेस मोठा फायदा झाला.

त्यामुळेच चित्रपट प्रदर्शनासाठी ईद मोठी संधी ठरली आहे आणि अनेक निर्मिती कंपन्या या वेळी चित्रपटगृहे बुक करण्यासाठी संघर्ष करतात. सलमानने गेल्या वर्षी आपला चित्रपट ईदला प्रदर्शित करणार नाही, असे ठरवले होते आणि रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनात बनलेल्या शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला वाट मोकळी करून दिली होती. या चित्रपटाने भारतीय सिनेमामध्ये कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले. आता सलमान पुढच्या ईदच्या तारखा परत घेऊ इच्छित आहे. साजिद नाडियादवाला दिग्दर्शित त्याचा ‘किक’ 2014च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे तो 2015च्या ईदलादेखील बीइंग ह्युमन प्रॉडक्शनमधील चित्रपट प्रदर्शित करणार आहे. याचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहेत. चित्रपटाची हीरोइन अद्याप ठरलेली नाही. सलमानने 2014 आणि 2015 च्या ईदला चित्रपट प्रदर्शन निश्चित केले आहे. सलमानला ईदला चित्रपट प्रदर्शित केल्याने खूप फायदा झाला आहे. त्यामुळे तो या तारखा कोणालाही देऊ इच्छित नाही. शिवाय त्याचे सगळे चाहतेदेखील ईदला त्याच्या चित्रपटाची वाट पाहत असतात. त्यामुळे चाहत्यांना नाराज न करण्याचे त्याने ठरवले आहे.

पुढे वाचा... शाहरुखसोबत नव्हे, सलमानसोबत सहज वाटते