आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेगम करीना आता होणार सलमानची हीरोइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रूपेरी पडद्यावरील हिट जोड्यांपैकी एक सलमान खान आणि करीना कपूरची जोडी आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वच चित्रपटांना लोकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. या जोडीचे ‘क्योंकि’, ‘मैं और मिसेज खन्ना’ आणि ‘बॉडीगार्ड’ चित्रपट गाजले आहेत. यानंतर दोघे ‘दबंग 2’च्या एका आयटम साँगवर थिरकताना दिसले. त्यावेळी करीनाचे लग्न झाले होते, हनिमूनवरून आल्यानंतर तिने हे गाणे शूट केले होते. त्यावेळी सलमानने आता करीनासोबत रोमँटिक दृश्य करणे चांगले वाटणार नसल्याचे म्हटले होते.
मात्र आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी म्हणजे ही जोडी सूरज बडजात्याच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या सिनेमाविषयी, शिवाय जाणून घ्या करीनापूर्वी कोणती अभिनेत्री होती पहिली पसंत...