आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan And Katrina Kaif Togather In Mahboob Studio

जाणून घ्या अचानक समोर आले सलमान आणि कतरिना, तेव्हा काय झाले?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही दोन स्टार्समध्ये पॅच-अप किंवा ब्रेक-अप होणे ही काही मोठी गोष्ट नाहीये. परंतु, जेव्हा दोन एक्स गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांच्या समोर येतात तेव्हा तो प्रसंग नक्कीच बघण्यासारखा असतो. अलिकडेच सलमान खानसोबही असेच काही घडले. यावेळी त्याच्या समोर दुसरे-तिसरे कोणी तर त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ त्याच्या समोर आली होती.
झाले असे, की काल (23 जानेवारी) संध्याकाळी 4 वाजेच्या दरम्यान सलमान खान त्याचे भावोजी अतुल अग्निहोत्रीच्या 'ओ तेरी' सिनेमाचे ट्रेलर लाँचसाठी मेहबूब स्टूडिओमध्ये गेला होता. त्याचवेळी कतरिनासुध्दा तिच्या एका सिनेमाच्या शुटिंगसाठी मेहबूब स्टूडिओमध्ये गेली होती.
परंतु तिथे सलमान आणि कॅट एकमेकांसमोर येऊन देखील दोघेही एकमेकांना न बघता तिथून निघून गेले. या प्रसंगावरून असे दिसून येते, की रणबीरसोबतच्या अफेअरनंतर कॅट आता सलमानला पूर्णत: विसरली आहे.
कॅटने त्यावेळी लाल रंगाचा लेहंगा घातलेला होता आणि लाल रंगाची टिकलीसुध्दा लावलेली होती त्या ड्रेसमध्ये ती खूप आकर्षक दिसत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सलमान आणि कॅटविषयी अधिक माहिती, सोबतच बघा मेहबूब स्टूडिओमध्ये झालेल्या या प्रसंगाची काही छायाचित्रे...