आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Salman Khan And Sajid Nadiyawala On The Sets Of Kick

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वतः सकाळी 5.30 वाजता उठतो सलमान, साजिदलाही सोबत घेऊन जातो फिरायला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला व्यायामाची असलेली आवड त्याच्या चाहत्यांना ठाऊक आहे. नियमित व्यायामामुळेच सलमान खान वयाच्या 47व्या वर्षीसु्द्धा फिट अँड फाइन आहे. आपल वजन वाढल्याचे लक्षात आल्यावर तो नियमित सायकलिंगसुद्धा करतो.
सध्या सलमान खान आपल्या आगामी 'किक' सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा साजिद नाडियावाला दिग्दर्शित करत आहे. दिग्दर्शक म्हणून साजिद नाडियावाला यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली असून ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आहेत.
शुटिंग सेटवरील एका सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान रोज सकाळी साडे पाचला उठतो आणि आपल्यासोबत तो साजिदलाही उठवतो. त्यानंतर हे दोघे सकाळी 10.30 पर्यंत बाईकवर एकत्र फिरत असतात. विशेष म्हणजे सलमान वेळेवर शुटिंग सुरु करण्यावर भर देताना दिसतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या बॉलिवूडमधील आणखी रंजक घडामोडी...