आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या कतरिनाच्या वाढदिवशी नेमके काय घडले होते, की शाहरुख-सलमान झाले शत्रू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' अर्थातच शाहरुख आणि सलमान यांच्यात आता पॅचअप झाले आहे. अलीकडेच मुंबईत आमदार बाबा सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सलमान आणि शाहरुखला आमंत्रित करण्यात आले होते. या पार्टीत शाहरुख पहिले पोहोचला. शाहरुख पाठोपाठ सलमानची एन्ट्री या पार्टीत झाली. यावेळी उपस्थितांना एका दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. हा दुर्मिळ क्षण म्हणजे शाहरुख आणि सलमानची गळाभेट.
गेल्या पाच वर्षांपासून हे दोघे एकमेकांसमोर येणे सतत टाळत होते. शाहरुख ज्या ठिकाणी आमंत्रित असायचा त्या ठिकाणी सलमान अनुपस्थित तरी असायचा किंवा शाहरुख तेथून निघून गेल्यानंतर तो त्या ठिकाणी पोहोचायचा.
एकेकाळी भावाप्रमाणे राहणारे हे दोन स्टार्स एकमेकांचे शत्रु कसे झाले, या दोघांमध्ये वादाची ठिणगी कशी पडली, हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बॉलिवूडचे करण-अर्जुन कसे वेगळे झाले होते ते सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सलमान-शाहरुख कसे एकमेकांचे शत्रु झाले होते...