आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan And Shahrukh Khan Met At Baba Siddiqui\'s Party

सलमान-शाहरुखची भेट अचानक नव्हती, जाणून घ्या \'भरत भेटी\'मागचे सत्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता सलमान खान सध्या लाईमलाईटमध्ये आहे. यामागे दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे हिट अँड रन प्रकरण आणि दुसरे म्हणजे शाहरुखबरोबरचे त्याचे पॅचअप. 22 जुलै रोजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सलमानने शाहरुखला मिठी मारताच या दोघांची सगळीकडे चर्चा होऊ लागली.
मात्र ही 'भरत भेट' खरी नसल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का ? सलमान आणि शाहरुखच्या भेटीमागचे सत्य काही वेगळेच आहे. पार्टीत उपस्थित असलेल्या आमच्या एका सुत्राने खुलासा केला आहे, की सलमान या पार्टीत हजेरी लावणार असल्याचे शाहरुखला आधीपासूनच ठाऊक होते.
दोन्ही स्टार्सच्या पीआर क्रूने आधीच या पार्टीचे संपूर्ण शेड्युल माहित करुन घेतले होते. कोणता स्टार किती वाजता या पार्टीत दाखल होणारेय हे सलमान आणि शाहरुखच्या पीआरला माहित होते. दोन्ही स्टार्सचा आमनासामना होऊ नये म्हणून ही खास तयारी करण्यात आली होती. कारण मागील काही कार्यक्रमांत जेव्हा जेव्हा हे दोघे समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या पार्टीत हे एकमेकांसमोर येऊ नये यासाठी त्यांचे पार्टीत येण्याच्या वेळा दोघांच्याही पीआरनी माहित करुन घेतल्या होत्या.
यावरुन पार्टीत जे काही घडले ते नकळत नसून विचारपूर्वक घडवून आणण्यात आले आल्याचे दिसून येते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या 'भरत भेटी'मागे असलेले सत्य आणि यामुळे कुणाला काय फायदा होणारेय...