आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख-सलमान झाले शेजारी-शेजारी, 'मन्नत'जवळ सलमानचे शंभर कोटींचे घर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शाहरुख खान आणि सलमान खान आता झालेत शेजारी-शेजारी. विश्वास बसत नाहीये ना... अहो पण हे खरे आहे. सलमानने चक्क शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याजवळून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे.

सलमान गेली अनेक वर्षे आपल्या कुटुंबियांसमवेत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहातो. सलमानचा फ्लॅट 1 बीएचके आहे. मात्र आता त्याला हा फ्लॅट लहान वाटत असल्यामुळे त्याने मोठा फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी सलमानने शाहरुखच्या 'मन्नत'च्या शेजारी असलेल्या ‘सागर रेशम’ या इमारतीमधील एका फ्लॅटची निवड केली. या घराची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी असल्याची चर्चा आहे.

सलमानने खरेदी केलेला हा फ्लॅट एका गुजराती कुटुंबाच्या मालकीचं आहे. या इमारतीतून समुद्राच विहंगम दृश्य दिसतं. हे घर खरेदी करण्याच्या उद्देशाने सलमानने अनेकवेळा या घराला भेट दिल्याचे सांगितले जाते. हे घर विकत घेतल्यावर सलमानच्या घरासमोर समुद्र असेल आणि शेजारी शाहरुख खानचा बंगला.

असो, सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील दुश्मनी जगजाहीर आहे. मात्र आता सलमान आपल्या नवीन घरामुळे का होईना शाहरुखच्या जवळ जाणार हे नक्की.