आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Salman Khan And Shilpa Shetty Visits To Sanjay Dutt House

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : शिल्पा शेट्टी आणि सलमान खानने घेतली मुन्नाभाईची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सलमान खान रविवारी सकाळी अमेरिकेहून परतला. न्यूरेलजियाचा उपचार करण्यासाठी सलमान अमेरिकेला गेला होता. तेथून परत येताच सलमान संजय दत्तला भेटायला त्याच्या घरी गेला. 1993 सालच्या मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. संजयने यापूर्वीच 18 महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यामुळे त्याला आता साडे तीन वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला शरणागती पत्करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे.

21 मार्चला निकाल आल्यानंतर अनेक सेलिब्रिटी संजयची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी येत आहेत. सलमाननेसुद्धा अमेरिकेहून परतल्यानंतर थेट संजयच्या घराचा रस्ता पकडला. सलमानबरोबरच शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्राबरोबर संजयची भेट घेतली.

एक नजर टाकुया संजयच्या घरी पोहोचलेल्या सलमान आणि शिल्पाच्या खास छायाचित्रांवर...