आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan, Anil Kapoor And Fardeen Khan Will Be Seen In The Sequel Of 'No Entry'

सलमानच्या ‘नो एन्ट्री...’चा अनेकांना मिळेल आधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘नो एन्ट्री में एन्ट्री’मध्ये सलमान खानची दुहेरी भूमिका आहे. निर्मिती कंपनी सहारा, दिग्दर्शक अनीस बज्मी आणि अभिनेता फरदीन खान यांच्यासाठी सलमानची ही दुहेरी भूमिका आधार ठरू शकते..
‘नो एन्ट्री में एन्ट्री’मध्ये सलमान खानसोबतच अनिल कपूर आणि फरदीन खान यांच्यादेखील दुहेरी भूमिका आहेत. ही वेगळ्या प्रकारची कथा आहे. यात सलमान, अनिल आणि फरदीनच्या बायका, तसेच त्यांच्या जुळ्या सावत्र भावांच्या गर्लफ्रेंड्स आणि ज्यांच्या मागे सहाजण लागले आहेत त्या नट्यादेखील आहेत. एकंदरीतच विनोदी प्रसंग देण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केलेला आहे. पाच वर्षांनंतर फरदीन खानदेखील 14 किलो वजन कमी करून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमनाच्या तयारीत आहे. खरे तर फरदीनच्या संपलेल्या करिअरनंतर त्याला या सिक्वेलपासून दूर ठेवण्याचा सल्ला सलमानच्या अनेक शुभचिंतकांनी दिला होता. मात्र, सलमान खान, अनिल कपूर आणि निर्माते बोनी कपूर यांनीदेखील त्या गोष्टीला नाकारले.
सलमानचे म्हणणे होते की, फरदीनचे पात्र काढल्यावर चित्रपटात पहिल्यासारखी मजा राहणार नाही. मात्र, सलमानच्या जवळच्या लोकांच्या मते, सलमान या चित्रपटाद्वारे फरदीनला पुन्हा बॉलिवूडमध्ये आणू इच्छित आहे. जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जय हो’द्वारे सलमानने अनेक तार्‍यांना बॉलिवूडमध्ये परत आणले. दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी या विनोदी चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. ‘रेडी’नंतर बज्मी यांचा कोणताही चित्रपट आला नाही. या चित्रपटाद्वारे अनीस यांची पुन्हा बॉक्स ऑफिसवर यश मिळवण्याची इच्छा आहे.
सहारा कंपनीदेखील अनेक कायदेशीर कचाट्यात अडकली आहे. तरीसुद्धा कंपनीशी जुळलेली प्रत्येक व्यक्ती विश्वसाने काम करत आहे. कंपनीने अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘गुलाब गँग’चीदेखील निर्मिती केली आहे. याबरोबरच कंपनीने ‘नो एन्...ट्री’ मध्येदेखील रस दाखवला आहे. सलमानचा आधार घेऊन या सिक्वेलनंतर बॉलिवूडच्या यशस्वी निर्मिती कंपनीत पुन्हा एकदा जम बसवण्याचा त्यांचा विचार आहे.