आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIC: सलमानने ठेवले 'जय हो'चे खास स्क्रिनिंग, मुलांना दाखवला सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानचा 'जय हो' सिनेमा रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. परंतु सलमानने सिनेमाच्या प्रमोशन सत्र अजून सुरूच ठेवले आहे. त्याने मुंबई परिसरातील प्रसिध्द केतनव स्टूडिओमध्ये 'जय हो'चे एक खास स्क्रिनिंग ठेवले होते.
या स्क्रिनिंगमध्ये त्याने एका सामाजिक संस्थाच्या मुलांना 'जय हो' सिनेमा दाखवला. त्यावेळी सलमानने त्यांच्यासोबत खूप धमाल-मस्ती केली आणि फोटो्ससुध्दा काढले. फोटो काढाताना तो इतका उत्साही झाला, की तो स्वत: कॅमेरा घेऊन फोटो काढायला लागला.
अलीकडेच, सलमानने एका मुलाखतीत सिनेमाच्या अपयशासाठी स्वत:ला जबाबदार ठरवले. कदाचित त्यासाठी सिनेमाच्या चांगल्या कमाईसाठी सलमान अशा वेगळ्या पध्दतीने प्रमोशन करत असावा.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सलमानच्या या खास स्क्रिनिंगचे काही खास छायाचित्रे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'दबंग' खानची धमाल...