आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPL: सलमानने फार्म हाऊसवर साजरा केला वाढदिवस, बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावली हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज 48वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सलमानने रात्री ब-याच उशीरापर्यंत पनवेल येथील फार्म हाऊसवर एक दमदार पार्टी दिली. सलमानच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते. आमिर खान, अनिल कपूर, एली अवराम, कुशाल टंडन, सुनील शेट्टी, पुलकित सम्राट, कुणाल कोहली, प्रतीक बब्बर याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनी सलमानचा बर्थडे साजरा केला. आमिर खानचा आज लग्नाचा वाढदिवस आहे तरीसुध्दा तो आपल्या जिवलग मित्राच्या पार्टीत सहभागी झाला. त्यानंतरआमिर खान त्याची पत्नी किरण रावसोबत पंचगनीला लग्नाचा वाढदिवस साजरा करायला गेला. फार्म हाऊसच्या बाहेर सलमानच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. यावेळी चाहत्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सलमानच्या पार्टीत आलेल्या काही सिनेतारकांची खास छायाचित्रे...