आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan, Daisy Shah Promote Jai Ho In Matching Costumes

\'जय हो\'च्या प्रमोशनवेळी सलमान-डेजीचा मॅचिंग लुक, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानचा आगामी 'जय हो' सिनेमा 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. सलमान खान आणि सिनेमाची अभिनेत्री डेजी शाह दोघेही या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलिकडेच दोघेही सिनेमा प्रमोशनसाठी दिल्लीला गेले होते. गंमतीशीर गोष्ट आहे, की यावेळी सलमान आणि डेजी शाह मॅचिंग ड्रेसमध्ये दिसले. दोघांनी गडद निळ्या रंगाचे ड्रेस घातले होते. सलमानने तिथे चाहत्यांशी सिनेमाविषयी बातचित केली.
काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये मॅचिंग ड्रेसचा ट्रेंड वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिका-रणवीर त्यांच्या 'राम-लीला' सिनेमाचे प्रमोशन करतेवेळी मॅचिंग ड्रेसमध्ये दिसले होते. 'जय हो' सिनेमा दक्षिण भारतीय सिनेमा 'स्टालिन'चा रिमेक आहे. या सिनेमात चिरंजीवी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 'जय हो'मध्ये सलमान मेजर जय अग्निहोत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन सलमानचा भाऊ सोहेल खानने केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सलमान आणि डेजीचा मॅचिंग लुक...