आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बडे भय्या’चा लहान भाऊ होण्यासाठी पाच दावेदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकसलमान खान या वर्षाच्या अखेरीस सूरज बडजात्या यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करेल. चित्रपटाचे नाव ‘बडे भय्या’ असे ठेवण्यात आले आहे. सलमान यामध्ये मोठय़ा भावाच्या भूमिकेत दिसणार असून त्याचे दोन लहान भाऊ यात असतील.

त्यापैकी एकासाठी ‘फुकरे’ फेम पुलकित सम्राटचे नाव निश्चित करण्यात आले आहे, तर दुसर्‍या भावाच्या भूमिकेसाठी पाच कलावंतांनी आपली दावेदारी सादर केली आहे. त्यामध्ये आदित्य रॉय कपूर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, सूरज पांचोली आणि बिलाल अमरोही यांचा समावेश आहे. या पाच दावेदारांमागे खास कारणेसुद्धा आहेत. एकीकडे सलमानची मॅनेजर रेश्मा शेट्टीच आदित्य, वरुण आणि सिद्धार्थचे काम पाहते, तर दुसरीकडे सूरज पांचोलीला सलमान अपली आवडती संहिता ‘हीरो’सह लाँच करत आहे. कमाल अमरोहीचा नातू आणि ताजदार अमरोहीचा मुलगा बिलालला सलमानच्या बहिणीचा नवरा अतुल अग्निहोत्री आपल्या चित्रपटाद्वारे लाँच करत आहे.

या पाच सशक्त दावेदारांपैकीच सूरज बडजात्या यांना तिसरा कलावंत निवडायचा आहे. कोण कशाप्रकारे ही भूमिका मिळवतो, हे पाहणे रंजक ठरेल. बडजात्यांचा हा चित्रपट 1957 मधील सुनील दत्त-नूतन अभिनीत ‘मेहरबान’चा रिमेक असल्याचे बोलले जात आहे.