आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी-आदित्यमधला 20 वर्षांपासूनचा अबोला दूर, पुन्हा झाले मित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गेल्या 20 वर्षांपासून शेजारी असूनही सनी देओल आणि आदित्य चोप्रामध्ये अबोला होता. साधारणत: 20 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘डर’ सिनेमाच्या वेळी दोघांमध्ये वाद झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत दोघे बोलत नव्हते.
मात्र धाकटा भाऊ बॉबी देओलसोबत आदित्यची चांगली मैत्री आहे. बॉबी आणि आदित्य काही मित्रांबरोबर रोज क्रिकेट खेळतात. याच मैत्रीमुळे बॉबी यशराज बॅनरच्या सिनेमात दिसत होता.

आता बातमी आहे की, सनीसुद्धा जुन्या गोष्टी विसरून मैत्रीचा हात पुढे करण्यास तयार झाला आहे. त्यामुळेच कदाचित त्याच्या ‘यमला पगला दीवाना 2’ सिनेमाचे संगीत अधिकार आदित्यच्या कंपनीला मिळाले आहेत. दुसरीकडे क्रिकेट ग्रुपमधील मित्र सनीच्या मुलाला यशराज फिल्म्समध्ये लाँच करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ते सनीला विणवत आहेत. मात्र रॉकीला लाँच करण्याचा अद्याप काही निर्णय घेतला नसल्याचे देओल कुटुंबाचे म्हणणे आहे.