आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची भेट घेतल्यानंतर वादात अडकलेल्या सलमानने बदलली 'जय हो'च्या प्रमोशनची पध्दत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड दबंग स्टार सलमान खानने त्याच्या आगामी 'जय हो' सिनेमाच्या प्रचाराची पध्दत बदलली आहे. त्याने सांगितले की तो ज्या राज्यात जाईल, तेथील मुख्यमंत्र्यांना तो भेटणार आहे. सलमान लवकर त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी राजधानीमध्ये येणार आहे. त्यावेळी तो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटणार आहे.
मकर संक्रातीच्यावेळी अहमदाबादला सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेलेल्या सलमानने गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजप प्रधानमंत्री पदाचे उम्मेदवार नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्याने मोदींसोबत जेवण केले आणि पतंग उडवण्याचा आनंदही घेतला होता. परंतु तिथे त्याने उच्चारलेल्या काही शब्दांनी त्याला वादात अडकवले आहे. सलमान मोदींना 'गुड मॅन' म्हणाला होता. यावर राग व्यक्त करून अनेक पक्षाच्या संघटनांनी त्याच्या सिनेमाचे पोस्टर्स जाळले होते. सिनेमावर रिलीज करण्यावर बहिष्कार टाकला होता. या वादानंतर सलमानने आता ठरवले आहे, की ज्या राज्यात तो जाणार तेथील मुख्यमंत्र्यांना तो भेटणार आहे.
सलमानचा 'जय हो' सिनेमाची कथा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, कदाचित यामुळे तो इतक्या आक्रमकपणे त्याचे प्रमोशन करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सिनेमाचा प्रचार करण्याचा सलमानचा आणखी एक नवा फंडा...