आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Last Night Before Hearing Of Hit And Run Case

शेवटची रात्र : एक क्षणही झोपू शकला नाही सलमान, आईच्या गळ्याखाली उतरला नाही घास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानची आज (24 जुलै) मुंबई कोर्टात सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत सलमानवर आरोप निश्चिती झाल्यास त्याला शिक्षा होण्याची शक्यता आहे.
आता कोर्टाची तलवार मानेवर लटकत असल्यामुळे सलमान खानसाठी मंगळवारची रात्र कशी गेली असणार याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा निश्चित झाल्यास त्याला दहा वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सलमान एक क्षणही झोपू शकला नाही. आता त्याला काही वेळातच मुंबईच्या सेशन कोर्टात हजेरी लावाली लागणार आहे.
सलमानच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मेंटल' सिनेमाच्या शूटिंगवेळी सलमान खूप काळजीत होता. इतकेच नाही तर तो तिथे विश्रांतीसुद्धा घेत नव्हता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सलमानसाठी कशी ठरली शेवटची रात्र...