आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने लॉन्च केली 1.28 कोटीची ऑडी RS7, कॅटला गिफ्ट देण्याची इच्छा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड 'दबंग स्टार सलमान खान'ने मागील काही दिवसांत मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ऑडी RS.7 लॉन्च केली. ही गाडी ऑडीने इंडीयामध्ये लॉन्च केली आहे. या गाडीचे एक्स शोरुम किंमत 1.28 कोटी रुपये आहे. खास गोष्ट अशी आहे, की ऑडीने त्यांच्या या गाडीची पहिली डिलीवरी सलमान खानला देण्याची ऑफर केली आहे.
ऑडीच्या या नवीन लॉन्च झालेल्या गाडीचा लुक खूप आकर्षक आहे, ज्यावर नजर पडताच एखादा व्यक्ती तिच्या प्रेमात पडेल. या कारमुळे भारतातील कार मार्केटमध्ये आणखी एका लग्जरी स्पोर्ट कारचा सामावेश झाला आहे. या निमित्ताने उपस्थित असलेल्या सलमानची धम्मालही बघण्यासारखी होती.
सलमानने फक्त कार्यक्रमात धम्माल केली नाही तर माध्यमांच्या प्रश्नांचे उत्तरही दिले. यावेळी सलमानच्या तोंडून कतरिनाचे नाव निघालेच. सलमानने सांगितल, की तो ही गाडी कॅटला गिफ्ट देणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या गाडीचे वैशिष्ट्ये...