आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न करो अथवा न करो, पप्पा नक्की व्हायचंय सलमानला, पाहा चिमुकल्यांवरील प्रेमाची झलक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच सलमान खानचा 'जय हो' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला त्याच्या मागील सिनेमांच्या तुलनेत दमदार ओपनिंग मिळू शकले नाही. त्यामुळे कमाईत हा सिनेमा इतर सिनेमांपेक्षा मागे राहिल, अशी चिन्ह दिसत आहेत. तसं पाहता, सलमान स्वतः म्हणतो, की त्याचे दोनशे-तीनशे कोटींच्या कमाईशी काही देणे-घेणेनाही.
असो, हे झालं त्याच्या सिनेमांविषयी. सलमान त्याच्या सिनेमांपेक्षा खासगी आयुष्यातील काही खास गोष्टींसाठी ओळखला जातो. अयशस्वी ठरलेले प्रेमसंबंध, त्याची समाजसेवी संस्था बिईंग ह्युमन, त्याचा तापट स्वभाव आणि विशेष म्हणजे लहान मुलांवर असलेले अतोनात प्रेम... या गोष्टींसाठी तो ओळखला जातो.
सलमानने अद्याप लग्न केलेले नाही. मात्र सलमान खानची लहान मुलांबरोबरची बाँडिंग बघता तो एक चांगला पिता बनू शकतो, असे आपण म्हणू शकतो. सिनेमाचा सेट असो, इवेंट्स असो, रिअ‍ॅलिटी शो असो, किंवा घर... सलमान लहानग्यांबरोबर मजामस्ती करताना दिसतो. चिमुकल्यांना बघताच त्याचा राग कुठल्या कुठे पळून जातो.
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती, की सलमान खानची सध्या तरी लग्न करण्याची इच्छा नाहीये, मात्र त्याला एक मुल दत्तक घ्यायचे आहे. आता सलमान मुल दत्तक घेणार की नाही हे येणा-या दिवसांत स्पष्ट होईल.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लहान मुलांबरोबर असलेली बाँडिंग छायाचित्रांमधून दाखवतोय. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा लहानग्यांबरोबर सलमान कसा एन्जॉय करतो...