आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Makes Fun Of Shah Rukh Khan’S Injury

सलमानने उडवली शाहरुखची खिल्ली, म्हणाला \'जय हो\'च्या रिलीजवेळीच जखमी व्हायचे होते?\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान आणि बॉलिवूड 'किंग' शाहरुख खान यांच्यामध्ये आजकाल काय सुरु आहे हे दोघांव्यतिरिक्त कुणालाच ठाऊक नाहीये. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही स्टार्सकडे बघून त्यांच्यात पुन्हा मैत्री होऊ शकेल, अशी चिन्ह दिसू लागली होती. परंतु सलमानच्या एका वागणुकीमुळे काहीही घडले तरी हे दोघे मित्र होऊ शकत नाही, हे पुन्हा स्पष्ट झालंय .
अलीकडेच, सलमान आणि शाहरुख एका अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाले होते. सलमान त्या अवॉर्ड सोहळ्याचे होस्टिंग करत होता. त्यावेळी सलमानने स्वत:हून शाहरुखची विचारपूस केली होती आणि जेव्हा शाहरुख स्टेजवर आला तेव्हा दोघांनी गळाभेट घेतली होती. परंतु आता झाले असे, की शाहरुख काल (23 जानेवारी) त्याच्या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान जखमी झाला, तेव्हा सलमानने त्याच्या अपघातावर आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.
सलमानला शाहरुखच्या या अपघाताविषयी विचारल्यानंतर तोच प्रतिप्रश्न करत म्हणाला, 'शाहरुखला 'जय हो'च्या रिलीजच्या एक दिवस आधीच जखमी व्हायचे होते का?'. एवढेच नाही तर, सलमान याविषयी खूप काही बोलला. आता शाहरुखला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्याची तब्येत ठिक असल्याचे सांगितले जात आहे.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत आहोत, की शाहरुखच्या अपघाताविषयी काय-काय म्हणाला सलमान...?