बॉलिवूडचा 'दबंग' अर्थातच
सलमान खानला आपल्या भावांवर किती प्रेम आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्यांचे प्रोफेशन काम असो किंवा खासगी काम या भावांमधील प्रेम आणि जिव्हाळा लगेच दिसून येतो. अलीकडेच, सलमान खानने त्याच्या
फेसबुक पेजवर एक फोटो शेअर केला होता, या फोटोत तो त्याच्या दोन्ही भावांसोबत घरात जेवण करताना दिसतोय.
बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चाहत्यांसोबत जोडून राहण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइट्सवर काही ना काही अपडेट करतच असतात. काही दिवसांपूर्वी बिग बींनी त्यांच्या ब्लॉगवर त्यांचे काही खासगी फोटो शेअर केले होते. परंतु सध्या सलमानने शेअर केलेले फोटो खूप चर्चेत आहेत.
तसे पाहता, स्टार्स त्यांच्या खासगी फोटोंच्या बाबतीत खूप जागरूक असतात. वरील फोटोवरून तुम्ही याचा अंदाज बांधू शकता, की हा फोटो किती खासगी आहे. त्यामध्ये सलमान त्याच्या भावांसोबत आणि मित्रांसोबत मद्यपान करताना आणि शर्टलेस असलेला दिसतोय.
ज्यावेळी हा फोटो इंटनेटवर शेअर केला होता, तेव्हा सलमान खूप नाराज झाला होता. त्याने स्पष्ट सांगितले होते, की या पार्टीची छायाचित्रे व्हायरल व्हायला नकोत. परंतु हा एक फोटो इंटनेवर समोर आलाच. आता ते काही असो, परंतु इंटरनेटवर आलेले फोटो शेअरिंगमुळे डिलीट करणेदेखील अशक्य असते.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सलमान खानच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरून शेअर केलेली सलमानची काही खासगी छायाचित्रे. यामध्ये सर्वाधिक छायाचित्रे त्याच्या घरातील आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा सलमाने स्वत: शेअर केलेली छायाचित्रे...