आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'किक\'चे शुटिंग झाले सुरू, पाहा सलमानचा नवीन लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानचा मागील काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'जय हो' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाल दाखवली नाही. सलमानच्या त्या सिनेमाकडून ब-याच अपेक्षा केल्या जात होत्या. सर्वांनाच वाटले होते, की हा सिनेमा 250 कोटींपासून 300 कोटींपर्यंत कमाई करेल. परंतु या सिनेमाने 150 कोटींचा आकडादेखील व्यवस्थितरित्या पार केला नाही. सध्या सलमान त्याच्या 'किक' या आगामी सिनेमामध्ये व्यस्त आहे.
सलमान त्याच्या या सिनेमामध्ये फ्रेंच बियर्डमध्ये दिसू शकतो. कारण सध्या सलमान त्याच्या शुटिंगसाठी याच लूकमध्ये वावरत आहे. हा सिनेमा साजिद नाडियावाला दिग्दर्शित करणार आहे. एका दिग्दर्शकाच्या भूमिकेत साजिदचा हा पहिला सिनेमा आहे. अलीकडेच, सलमान खान साजिदसोबत एका गाडीवर बसून जाताना दिसले होते. सांगितले जात आहे, की दोघेही सकाळी लवकर उठून राइडसाठी जातात आणि आल्यानंतर शुटिंगमध्ये व्यस्त होतात.
'किक' सिनेमात सलमानची को-कास्ट जॅकलीन फर्नांडिस आहे. याव्यतिरिक्त रणदीप हुड्डा, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि मिथून चक्रवती हे स्टार्स सहकलाकारच्या भूमिकेत दिसणार आहे. असेही सांगितले जात आहे, की या सिनेमाचा खलनायक नवाजुद्दीन असणार आहे. साजिदने हा सिनेमा रिलीज करण्यासाठी 25 जुलै 2014 हा दिवस निवडला आहे.
'किक'ची शुटिंग सुरू तर झाली आहे. सोबतच, सिनेमाची काही छायाचित्रे समोर आली आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सलमानच्या या सिनेमाची काही खास छायाचित्रे पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सलमान खानचा सिनेमातील नवीन लूक...