आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोधपूरमध्ये कोर्टाची पायरी चढून मुंबईला परतला सलमान, वकिलांसह दिसला चर्चा करताना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुचर्चित काळविट शिकार प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान बुधवारी जोधपूर कोर्टात हजेरी लावली होती. सलमानवर सुरू असलेल्या दोन खटल्यांची सुनावणी एकत्रित करण्यात यावी अशी मागणी सलमानच्या वकिलाने यावेळी कोर्टात केली.
काळविट शिकार प्रकरणात कोर्टात गैरहजर राहण्याची सूट मिळालेल्या सलमानला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून जबाब नोंदवण्याचा समन्स बजावण्यात आला होता. त्यानुसार सलमान बुधवारी जोधपूर कोर्टासमोर हजर झाला. 1998 मध्ये जोधपूरमधील कनकनी गावात झालेल्या काळविट शिकार प्रकरणात परवान्याची मुदत संपलेले शस्त्र बाळगल्याचा सलमानवर आरोप आहे.
या सुनावणीदरम्यान सलमानने आपल्या जबाबात त्याच्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले. त्याने स्पष्टीकरण देताना म्हटले, की आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याने काळविटाची शिकार केली नव्हती. सलमानचा जबाब नोंदवल्यानंतर याप्रकरणाच्या पुढच्या सुनावणीसाठी कोर्टाने 10 मार्चची तारीख निश्चित केली आहे.
कोर्टात हजेरी लावून सलमान मुंबईला परतला. यावेळी तो आपल्या वकिलांसह चर्चा करताना कॅमे-यात कैद झाला. यावेळी सलमानचा बॉडीगार्ड शेरा त्याच्यासोबत हजर होता. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा जोधपूरहून मुंबईला परतल्यानंतर क्लिक झालेली सलमानची छायाचित्रे...