Home »Top Story» Salman Khan Reveals Why He Helped Jagdish Mali

सलमानने केली अंतरा माळीची कान उघाडणी

भास्कर नेटवर्क | Jan 18, 2013, 15:21 PM IST

  • सलमानने केली अंतरा माळीची कान उघाडणी

अभिनेता सलमान खानने अंतरा माळीला चांगलेच सुनावले आहे. बुधवारी अंतरा माळीचे वडील आणि प्रसिद्ध फोटोग्राफर मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागताना मिंकला आढळून आले होते. मिंकने लगेचच ही बातमी सलमानच्या कानावर घातली आणि सलमानने तातडीने जगदीश माळींना मदतीचा हात दिला. मात्र अंतरा माळीने माझे वडील मानसिक रोगी नाहीत. ते आजारी असून, आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नसल्याचे गुरुवारी म्हटले होते.
यावर सलमानने अंतरा माळीची चांगलीच कान उघाडणी केली.

सलमानने म्हटले की, ''तुझे वडील भिका-यांच्या रांगेत उभे होते आणि तरीही तू म्हणतेस त्यांना मदतीची गरज नव्हती. तसे असेल तर कुणाला मदतीची गरज होती ते तुच मला सांग ? जेव्हा मला याची माहिती मिळाली, मी काही लोकांना फोनकरून कळविले. आणि त्यांना मदत उपलब्ध करुन दिली''

जगदीश माळी यांच्याबाबत बोलताना सलमान म्हणाला की, ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर होते. त्यांच्याकडून फोटो काढून घेण्यासाठी एकेकाळी आम्हालाही संघर्ष करावा लागला होता.

वडिलांच्या प्रकृतीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करणा-या अंतरावर बॉलिवूडमधून टीका होत होती. आपली बाजू सांभाळण्यासाठी अंतराने एक पत्रक काढून आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नसल्याचे म्हटले होते. यावर सलमानने अंतराला चोख शब्दांत उत्तर दिले.

Next Article

Recommended