आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान सातवे आसमान पर... तब्बल 500 कोटींच्या करारावर केली स्वाक्षरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खानची बातच निराळी आहे. सलमान खान फक्त मोठ्या पडद्यावरच नाही तर छोट्या पडद्यावरचाही बॉस झाला आहे. 'स्टार इंडिया' या वाहिनीने सलमानबरोबर त्याच्या सिनेमांच्या उपग्रह प्रक्षेपणाबाबत तब्बल 500 कोटी रुपयांचा करार केला आहे.

लागोपाठ सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर सलमानच्या फॅन आणि फॉलोअर्सची संख्या प्रचंड वाढलीय. सलमानने आपल्या स्टारडमच्या आधारावर 'स्टार इंडिया' या वाहिनीला करारासाठी ५०० कोटींचा आकडा सांगितला. सलमानची लोकप्रियता लक्षात घेता वाहिनीनेसुद्धा त्याला या आकड्यासाठी होकार दिला. या करारानुसार सलमानचे आगामी पाच वर्षांतील सर्व सिनेमे 'स्टार'वरून प्रसारित होणार आहेत. विशेष म्हणजे सलमान आणि या वाहिनीमधला इतक्या मोठ्या आकड्याचा करार तोही जाहीररितीने झालेला देशातील पहिलाच करार ठरणार आहे. 'स्टार'ने जानेवारी 2013 ते डिसेंबर 2017 पर्यंतच्या सलमानच्या सिनेमांचे 'सॅटेलाईट' प्रसारणासाठी 500 कोटींचा करार केला आहे.

2009मध्ये आलेल्या 'वाँटेड' या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर सलमानचे करिअर यशोशिखरावर पोहोचले आहे. गेल्या पाच वर्षांत सलमानने रेड्डी, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर, दबंग 2 हे एकामागून एक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. सलमानच्या या सगळ्या सिनेमांनी शंभर कोटींपेक्षा जास्त बिझनेस करुन नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. त्याचाच फायदा सलमानला झाला आहे.