आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : ईदला लंडनमध्ये नव्हे भारतातच होता सलमान, दिसला नाही चेह-यावर आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये ईद धुमधडाक्यात साजरी केली गेली. एकीकडे शाहरुखने आपल्या मन्नतवर जंगी पार्टी आयोजित केली होती. तर दुसरीकडे दबंग सलमान खानने आपल्या कुटुंबीय आणि मित्रांबरोबर ईद साजरी केली.
'किक' सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने सलमान लंडनमध्ये असल्याची बातमी आली होती. मात्र ईदच्या निमित्ताने सलमानने शूटिंग थांबवून मुंबई गाठली आणि दरवर्षीप्रमाणे यंदाचीही ईद आपल्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांबरोबर साजरी केली. सलमानला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या वांद्र्यातील घराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी जमली होती.
सलमानने आपल्या घराच्या बालकनीतून बाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि हात हलवून अभिवादन केले. तसे पाहता यावेळी सलमानच्या चेह-यावर आनंद दिसला नाही. संपूर्ण वेळ तो खूपच गंभीर दिसला. आता यामागचे कारण काय ? हे तर सलमानलाच ठाऊक.

बघा ईदच्या दिवशी क्लिक झालेली सलमानची खास छायाचित्रे...