आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Spotted With His New Ladylove For The First Time

पहिल्यांदाच नवीन गर्लफ्रेंडबरोबर दिसला सलमान खान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दबंग' सलमान खानची लव्ह लाईफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण कतरिनाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर आता एक नवीन तरुणी त्याच्या आयुष्यात आली असल्याची चर्चा आहे. सलमानचे रोमानियन अभिनेत्री लूलिया वेंचरबरोबर अफेअर सुरु असून ती सध्या त्याच्या मुंबईतील घरी त्याच्याबरोबर वास्तव्याला असल्याची अफवा आहे.

लूलिया फक्त त्याची चांगली मैत्रीण आहे की मैत्रीपलिकडेही त्यांचे नाते आहे यावर अद्याप सलमानने मौन बाळगले आहे.
एकीकडे यासगळ्या चर्चा रंगत असताना पहिल्यांदाच सलमान आणि लूलिया एकत्र दिसले. त्यामुळे या चर्चांना आणखीनच ऊत आला आहे.

अलीकडेच सलमान आणि लूलिया हैदराबाद विमानतळावर एकत्र दिसले. हैदराबादमध्ये सध्या सलमानच्या आगामी 'मेंटल' सिनेमाचे शूटिंग सुरु आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही एकाच फ्लाईटने येथे पोहोचले. मात्र मीडियाच्या नजरेतून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे दोघेही वेगवेगळे विमानतळाच्या बाहेर पडले.

सलमान येणार म्हटल्यावर तिथे मीडिया उपस्थित नसेल, असं बरं कसं होईल. यावेळी सलमानने मीडियाला पोज दिले. मात्र सलमानचा मित्र नदीम लूलियाला कॅमे-याच्या नजरेतून वाचवत सोबत घेऊन गेला,

सलमानने लूलियासाठी हॉटेलवर पोहोचण्यासाठी एक लग्झरी कार बूक केली होती तर तो स्वतः कॅबमधून हॉटेलवर गेला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा लूलियाची खास छायाचित्रे...